हरिग्राम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजश्री घरत यांची निवड.

हरिग्राम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजश्री घरत यांची निवड..
पनवेल दि.13 (वार्ताहर): हरिग्राम ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या राजश्री दिपक घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेली पंचवीस वर्षे हरिग्राम ग्रामपंचायतवर शेकापची एकहाती सत्ता आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे हरिग्राम शाखा प्रमुख दिपक घरत यांच्या पत्नी राजश्री घरत यांची निवड करण्यात आली.        

यावेळी हरिग्राम ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य महाविकास आघाडीचे सारे पदाधिकारी मंडळी तसेच पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना नेते रामदास पाटील, वृषाली देशेकर, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष नामदेव फडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष दर्शन ठाकुर, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.