वीर वाजेकर शेठ यांच्या 41 व्या पुण्यतिथीचे आयोजन.

वीर वाजेकर शेठ यांच्या 41 व्या पुण्यतिथीचे आयोजन

उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )श्रमजीवी जनतेचे नेते, उरणचे भाग्यविधाते स्वर्गीय तुकाराम हरी वाजेकर यांची 41 वी पुण्यतिथी मंगळवार दि 15/2/2022 रोजी सकाळी 10 वाजता उरण पेठा मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण शहर येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात येणार आहे. तसेच सकाळी 9:30 वा. राजपाल नाका ते राघोबा मंदिर या मार्गाचे ‘तुकाराम हरी वाजेकर’ या नामफलकाचे अनावरण विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. उरणमधील सर्व जेष्ठ सभासद, नागरिकांनी या कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन उरण पेठा मिठागर कामगार संघटनेचे बा. ध. पाटील, उरण पेठा मीठ उत्पादक संघटनेचे महादेव बंडा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.