घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास.

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
पनवेल दि.13 (संजय कदम): एका बंद घरात अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरातील बंदररोड येथील कोनार्क प्लाजा सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अल्ताफ नमरे यांच्या राहत्या घराच्या दरवाज्याचे लॅच लॉक कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोखरक्कम असा मिळून 3, 58, 320 रू. चा मुद्देमाल घरफोडीत चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.