पोलीस निरीक्षक यांनी मिळविला दुसऱ्यांदा ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान

महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी मिळविला दुसऱ्यांदा ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान
पनवेल दि.13 (संजय कदम): महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी व घवघवीत यश संपादन करून परकीय भूमीवर भारताचा झेंडा फडकावला आहे.
नुकत्याच झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत देखील सुभाष पुजारी यांनी ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ हा बहुमान दुसऱ्यांदा पटकावून या प्रकारात आपला दबदबा किती आहे हे दाखवून दिलेले आहे. तसेच त्यांची पाँडिचेरी येथे देश पातळीवरील होणाऱ्या ‘मास्टर भारत श्री’ स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. पाँडिचेरी येथे होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातर्फे सुभाष पुजारी हे सहभागी होणार आहेत व त्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. सदर बाब ही खरोखरच महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देखील अधिक उंचावली गेली आहे. सुभाष पुजारी यांना महाराष्ट्र पोलीस दलातून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा मिळाल्याच आहेतच. परंतु महाराष्ट्रातील इतर सर्व क्षेत्रातून देखील शुभेच्छाचा वर्षाव झाल्याचे दिसून येते. जिद्द, चिकाटी व परिश्रम याचे उत्तम व आदर्श उदाहरण म्हणजे सुभाष पुजारी. पाँडिचेरी येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता शुभेच्छा व जागतिक पातळीवर अव्वल येण्याचे त्यांचे जे ध्येय आहे त्या ध्येयाला गवसणी घालण्याकरिता त्यांना सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.