करंजा येथील रस्त्याचे व स्मशान भूमीच्या नूतनीकरणाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भूमीपूजन..

करंजा येथील रस्त्याचे व स्मशान भूमीच्या नूतनीकरणाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते भूमीपूजन

उरण दि 12(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील करंजा नाका ते सुरकीचा पाडा, बापदेव पाडा येथील रस्ता खराब झाल्याने सदर रस्त्यावरून जाताना जनतेला वेगवेगळ्या समस्याला तोंड द्यावे लागत होते. विविध त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याचा जनतेला त्रास होऊ नये यासाठी रस्त्याचे काम करण्याचे वचन ग्रामपंचायत सदस्य अमित भगत यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणुकीमध्ये जनतेला दिले होते. त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा करून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन फंड (डी पी डी सी )या योजनेतून सदर रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. त्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सुरकीचा पाडा येथील स्मशान भूमीच्या शेडच्या बांधकामाचे भूमीपूजनही करण्यात आले. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले ग्रामपंचायत सदस्य अमित भगत हे आपल्या परिसराचा, विभागाचा विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. विविध विकासकामासाठी त्यांचे सतत पाठपुरावा सुरु आहे.विरोधकांना विरोध न करता, त्यांना प्रतीउत्तर न देता प्रत्यक्ष कामातून ते आपली झलक दाखवितात असे मत ग्रामपंचायत सदस्य व्यंकटेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे काम सुरु झाल्याने आनंद व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी उरण विधानसभा मतदार संघांचे संपर्कप्रमुख महादेव घरत, उरण नगर परिषदेचे गटनेते गणेश शिंदे, चाणजे ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश थळी, ग्रामपंचायत सदस्य अमित भगत, व्यंकटेश म्हात्रे, कल्पना पाटील, सुप्रिया कोळी, शाखाप्रमुख रोहिदास म्हात्रे, उपशाखाप्रमुख राजू पाटील, उपशाखाप्रमुख विश्वनाथ पाटील,उपविभाग प्रमुख रवी पाटील, उपशाखाप्रमुख चंदन कोळी, माजी उपविभाग प्रमुख के एल कोळी, जेष्ठ शिवसैनिक माणिक पाटील, जेष्ठ नागरिक मधुकर कोळी, रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष महेश पाटील, हरी कोळी (काळ्या बुवा ), शिवसैनिक गणेश म्हात्रे,नंदू चव्हाण, चेतन पाटील,सामाजिक कार्यकर्ते मणिराम पाटील,युवराज पाटील, अमृत म्हात्रे, चंद्रकांत कोळी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.