चहाचे पैसे मागितले म्हणून केली मारहाण..
चहाचे पैसे मागितले म्हणून केली मारहाण
पनवेल दि.12 (वार्ताहर): चहाचे पैसे मागितले म्हणून नोकराला हाता बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून दुकानातील सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. आरोपींविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन वरंडे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय सेक्टर 17, कामोठे येथे आहे. यावेळी दोन ईसम मोटरसायकलवरून चहा घेण्यासाठी दुकानात आले. त्यापैकी सिद्धूने चहाची मागणी केली. त्याला चहा देऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने चहाचे कसले पैसे असे बोलून शिवीगाळ करून काऊंटरवर ठेवलेले दोन चहाचे थर्मास जमिनीवर फेकले व दुकानांमध्ये प्रवेश करून सचिन यांना आणि त्यांचा नोकर याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली व तुझ्या दुकान बंद करतो असे बोलून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच दुकानातील इतर सामान अस्ताव्यस्त फेकून तोडफोड केली व नुकसान केले. त्यानंतर ते दोघेही ईसम पळून गेले.