स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल.

स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्‍या इसमाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एक 35 वर्षीय महिला ही शहरातील एका लॉजमध्ये असताना त्या ठिकाणी अनोळखी इसम जावून त्याने रुमचा दरवाजा वाजवून सदर महिलेस मदत देण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडण्यास लावून आपले व पतीमधील वादविषयी सहानुभूती दाखविण्याच्या बहाण्याने सदर महिलेच्या हातास धरुन मुझे आपको गले लगाना है! असे बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृती करून सदर महिलेचा विनयभंग केला म्हणून या महिलेने सदर अनोळखी इसमा विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.