मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत..

.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचे पनवेलमध्ये जल्लोषात स्वागत
पनवेल, दि.11 (संजय कदम) ः मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचे आज पनवेलमध्ये कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पनवेल तेजस बिल्डिंग तळ मजला ठाणा नाका प्रांत कार्यालयाच्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय रायगड जिल्हा उदघाटन नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. अमित ठाकरे आल्याने पुन्हा नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्या मध्ये सकाळ पासून चैतन्य निर्माण झाले होते बाजूला नवनिर्माण सेना ध्वज अमित ठाकरे यांच्या हस्ते फडकवण्यात आला. रायगड जिल्हा महिला अध्यक्षा अदिती सोनार यांनी त्याचे स्वागत केले आणि महिला आघाडी पनवेलच्या समस्या सोडवण्याकरता पुढे येवून

जनमानसात जावून कार्य करा असा आदेश अमित ठाकरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मनसे आमदार राजू पाटील, गजानन काळे, स्नेहल जाधव, अदिती सोनार जिल्हध्यक्षा महिला सेना, अतुल भगत जिल्हाध्यक्ष, अक्षय काशीद जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना, अक्षय सुतार जिल्हध्यक्ष चित्रपट सेना, अविनाश पडवळ, वर्षा पाचभाई पनवेल तालुका अध्यक्ष, प्रिती खानविलकर पनवेल शहर अध्यक्ष, स्वरूपा सुर्वे पनवेल शहर उपाध्यक्षा, रुपाली मुरकुटे,तालुका सचिव तसेच पदाधिकारी आणि महिला आघङी आणि तरुणाई उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published.