पनवेल न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार
न्यायालयासमोरील रस्त्यावर चारचाकींना पार्किंग करण्यास सक्त मनाई
दुचाकींना ‘सम-विषम पार्किंग’ करण्याच्या सूचना

पनवेल न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार
न्यायालयासमोरील रस्त्यावर चारचाकींना पार्किंग करण्यास सक्त मनाई
दुचाकींना ‘सम-विषम पार्किंग’ करण्याच्या सूचना

पनवेल. दि. ०९(वार्ताहर): पनवेल शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोरील परिसर कायम वाहनांच्या गरड्याने घेरलेला दिसून येतो. त्यामुळे याठिकाणी न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना व या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पनवेल शहर वाहतुक शाखेच्या हद्दीतील जिल्हा सत्र न्यायालय लोखंडीपाडा व अशोकबाग आणि पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चारचाकी वाहनांना (कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) नो पार्कंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे पनवेल न्यायालयाच्या मार्गावर चारचाकी वाहनांना सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी ‘नो पार्कंग’ बाबत आणि दुचाकी वाहनांना ‘सम विषम पार्कंग’ बाबतची अधिसुचना घोषित करण्यात आली आहे. 
        पनवेल शहरातील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासंबधित येणाऱ्या विविध व्यक्तींची चारचाकी वाहने व दुचाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग केली जातात. त्यातच न्यायालयाच्या आजुबाजुला असलेले हॉस्पीटल व शासकीय कार्यालये या ठिकाणी लोकांची वर्दळ जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम न्यायालयाच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर होतो. न्यायालयासमोरील रस्त्याची लांबी व रुंदी याचा विचार करता सदर मार्गावर नो पार्कंग करणे आवश्यक बाब आहे. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहीका, अग्नीशमन अशा अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांना अडथळा होण्याचे अनेक प्रसंगही घडतात. या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशानुसार, या मार्गावर चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यासंबंधी सक्त मनाई करण्यात आली आहे. तर दुचाकींना सम-विषम नियमाने वाहने पार्किंग करणे बंधनकारक आहे.
        पनवेल शहरातील जिल्हा सत्र न्यायालय हे लोखंडीपाडा व अशोकबाग यांच्यामधुन पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर आहे. तसेच जिल्हा सत्र न्यायालय हे पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर आहे. पनवेल न्यायालय सध्या कार्यरत असलेल्या रस्त्याची अंदाजे लांबी १५० मीटर व अंदाजे रुंदी ४० फुट इतकी आहे. कोर्ट परिसरात आजुबाजुला खाजगी हॉस्पीटल, पोलीस उप आयुक्त कार्यालय, तालुका पोलीस ठाणे इत्यादी महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. तर न्यायालयाच्या समोरील बाजुस निलपार्क, शितल, गुरुकुल व पवन अशा चार रहीवाशी सोसायटया देखील आहेत. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *