कळंबोली स्टील मार्केट येथील एसी कंटेनरला लागली आग.

कळंबोली स्टील मार्केट येथील एसी कंटेनरला लागली आग
पनवेल दि.09(संजय कदम)

 कळंबोली स्टील मार्केट येथील भंगारात असलेल्या एका कंटेनरला अचानकपणे आग लागल्याची घटना आज घडली आहे सदर आगीच्या लपेटण्यात आजूबाजूची झाडे आल्याने वृक्षराई चे मोेठे नुकसान झाले आहे. सदर आगीमुळे परीसरातील लोकांची धअवपळ झाली व त्यांनी तातडीने अग्नीशमदलाला पाचरण करुन त्यांनी ही आग आटो्नयात आणली परंतु गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाठ होत असल्याने आगीचा प्रश्न एैरणीवर आला आहे.
फोटो: कंटेनरला लागलेली आग.

पनवेल न्यायालय परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार
न्यायालयासमोरील रस्त्यावर चारचाकींना पार्किंग करण्यास सक्त मनाई
दुचाकींना ‘सम-विषम पार्किंग’ करण्याच्या सूचना

पनवेल. दि. ०९(वार्ताहर): पनवेल शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोरील परिसर कायम वाहनांच्या गरड्याने घेरलेला दिसून येतो. त्यामुळे याठिकाणी न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना व या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पनवेल शहर वाहतुक शाखेच्या हद्दीतील जिल्हा सत्र न्यायालय लोखंडीपाडा व अशोकबाग आणि पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी चारचाकी वाहनांना (कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) नो पार्कंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे पनवेल न्यायालयाच्या मार्गावर चारचाकी वाहनांना सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी ‘नो पार्कंग’ बाबत आणि दुचाकी वाहनांना ‘सम विषम पार्कंग’ बाबतची अधिसुचना घोषित करण्यात आली आहे. 
        पनवेल शहरातील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासंबधित येणाऱ्या विविध व्यक्तींची चारचाकी वाहने व दुचाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग केली जातात. त्यातच न्यायालयाच्या आजुबाजुला असलेले हॉस्पीटल व शासकीय कार्यालये या ठिकाणी लोकांची वर्दळ जास्त असल्याने त्याचा थेट परिणाम न्यायालयाच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर होतो. न्यायालयासमोरील रस्त्याची लांबी व रुंदी याचा विचार करता सदर मार्गावर नो पार्कंग करणे आवश्यक बाब आहे. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहीका, अग्नीशमन अशा अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांना अडथळा होण्याचे अनेक प्रसंगही घडतात. या अनुषंगाने नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशानुसार, या मार्गावर चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यासंबंधी सक्त मनाई करण्यात आली आहे. तर दुचाकींना सम-विषम नियमाने वाहने पार्किंग करणे बंधनकारक आहे.
        पनवेल शहरातील जिल्हा सत्र न्यायालय हे लोखंडीपाडा व अशोकबाग यांच्यामधुन पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे जाणा-या रस्त्यावर आहे. तसेच जिल्हा सत्र न्यायालय हे पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर आहे. पनवेल न्यायालय सध्या कार्यरत असलेल्या रस्त्याची अंदाजे लांबी १५० मीटर व अंदाजे रुंदी ४० फुट इतकी आहे. कोर्ट परिसरात आजुबाजुला खाजगी हॉस्पीटल, पोलीस उप आयुक्त कार्यालय, तालुका पोलीस ठाणे इत्यादी महत्वाची शासकीय कार्यालये आहेत. तर न्यायालयाच्या समोरील बाजुस निलपार्क, शितल, गुरुकुल व पवन अशा चार रहीवाशी सोसायटया देखील आहेत. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता.
फोटो : वाहतूक कोंडी 

135 हॉटेल व्यवसायिकांना बजवल्या नोटीस
पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली कामोठे खांदा कॉलनी

हॉटेल व्यवसायिकांनो हॉटेलमध्ये गॅस लिक डिटेक्टर बसवा : विजय राणे मुख्य अग्निशमन अधिकारी
पालिका हद्दीतील 135 व्यावसायिकांना बजावल्या नोटिसा.. अन्यथा होणार कारवाई

पनवेल. दि. ०९(वार्ताहर): कामोठे वसाहतीमधील सेक्टर 11 मधील स्वतीक प्लाझा सोसायटी मधील भोजनालयाला मध्ये आग लागल्याची घटना घडल्या नंतर, सिडको आणि पनवेल महानगरपालिका अग्निशमन दल आता आक्रमक झाली आहे. अग्निशमन दलांने पालिका हद्दीतील 135 हॉटेल व्यावसायिकांना नोटीस बजावून lp गॅस सिलेंडर बाबतीत आवश्यक त्या सुरक्षा उपाय योजना  कराव्या अश्या नोटीस बजावल्या आहे. तसेच हॉटेल परिसरात गॅस लिक डिटेक्टर बसवण्याचे आवाहन अग्निशमन दलांनी केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
    कामोठे शहरामध्ये 1 फेब्रुवारीला रात्री 7  वाजण्याच्या सुमारास सेक्टर 11 मधील स्वस्तिक प्लाझा इमारतीच्या आवारात असलेल्या खानावळीत दोन सिलेंडर चा स्फोट होऊन, अक्राळ विक्राळ अशी आग लागली होती, या आगी मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र दोन दुकाने आणी पहिल्या मजल्यावरील दोन घरे जळून खाक झाली आहेत. या मध्ये लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. ही आग लागल्या नंतर सिडको आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली त्या नंतर आग का लागली याचा शोध घेतल्या नंतर सिलेंडर लिक होऊन आग लागल्याचे प्रथमदर्शनीय समोर आले आहे.  सिलेंडर लिक झाल्याने आग लागली आणि एका पाठोपाठ दोन सिलेंडर चा जागेवर स्फोट झाला आणि आग अधिक भडकत गेल्याचे सांगितले जात आहे. आग शांत झाल्या नंतर, अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी स्फोटात दोन तुकडे झालेले, दोन सिलेंडर आणि, अन्य दोन ते तीन सिलेंडर मिळून आले होते. अशी भयावह अवस्था त्या वेळेस घटनास्थळी होती, अग्निशमन दलाच्या जवानांमुळे, आग आटोक्यात आणली गेले अन्यथा मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती, ही आग लागल्या नंतर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत, या भोजनालय व्यावसायिकांनी हॉटेल चा परवाना देखील घेतला नसल्याचा सूर घटना स्थळी होता, तसेच अग्निशमन दलाची कोणतीही परवानगी या सोसायटी धारकांनी आणि भोजनालय मालकांनी घेतली नसल्याचे सांगितले जात आहे. त्या मुळे प्रशासनाच्या कार्यभरावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. आगीची घटना घडल्या नंतर अग्निशमन दलाने 2 फेब्रुवारी पालिका हद्दीत असलेल्या 135 हॉटेल व्यवसायिकांना नोटीस बजावून सुरक्षित उपाय योजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हॉटेल मध्ये  गॅस लिक डिटेक्टर बसवा असे आवाहन अग्निशमन मुख्य अधिकारी विजय राणे यांनी केले आहे. अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

चैकट
पालिका हद्दीत 135 हॉटेल व्यावसायिक नोंदणीकृत
पनवेल महानगरपालिका हद्दीत चार मोठ्या सिडको वसाहतीसह 29 ग्रामपंचायती चा समावेश होतो, अश्या मोठा परिसर असलेल्या पालिका हद्दीत केवळ 135 हॉटेल व्यवसायिकांनी नोंदणी केल्या असून अग्निशमन दलाच्या परवानगी घेतल्या आहेत. आणि अन्य शेकडो
हॉटेल व्यावसायिक खानावळ, भोजनालये हे परवाना शीवाय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.–

Leave a Reply

Your email address will not be published.