वीर वाजेकार महाविद्यालयात वाजेकर पुण्यतिथि व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि.15 फेब्रुवारीला संपन्न होणार.

वीर वाजेकार महाविद्यालयात वाजेकर पुण्यतिथि व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि.15 फेब्रुवारीला संपन्न होणार

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे ) रयत शिक्षण संस्थेच्या तु. ह. वाजेकर विद्यालय आणि वीर वाजेकर ए. एस. सी. कॉलेज, महालण विभाग फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 फेब्रुवारी 2022 रोजी वाजेकर पुण्यतिथि समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर तर आमदार बाळाराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.पी.जे पाटील,कृष्णाजी कडू,भावना घाणेकर, सुधीर घरत हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी दिली आहे. याच वेळी वीर वाजेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
याचे औचित्य साधून महाविद्यायातील सांस्कृतिक व क्रीडा विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सांस्कृतिक विभागाअंतर्गत रांगोळी, मेहेंदी, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, पारंपरिक वेशभूषा, कवितावाचन , इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर क्रीडा विभागामार्फत विविध वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कार्याध्यक्ष डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.