उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद म्हात्रे, पनवेल तालुका काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षपदी नंदराजशेठ मुंगाजी तर खालापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी कृष्णाशेठ पारंगे यांची वर्णी.

उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद म्हात्रे, पनवेल तालुका काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षपदी नंदराजशेठ मुंगाजी तर खालापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी कृष्णाशेठ पारंगे यांची वर्णी.

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे सूचने नुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, खालापूर.अश्या तीन तालुका अध्यक्षांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (MPCC ) कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग कार्यसम्राट अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. त्याप्रमाणे उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी तरुण तडफदार माजी रायगड जिल्हा परिषद सद्स्य विनोद गजानन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.
पनवेल तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी तरुण तडफदार नवीमुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त आठरा गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॅशिंग नेतृत्व नंदराज शेठ मुंगाजी यांची निवड करण्यात आली आहे.
तर खालापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल या तिन्ही नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या निवडीमुळे काँग्रेस पदाधिकारी सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.