अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने केला तळोजा परिसरातून जवळपास 5 लाख 89 रुपयांचा साठा हस्तगत.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने केला तळोजा परिसरातून जवळपास 5 लाख 89 रुपयांचा साठा हस्तगत. पनवेल दि.08 (वार्ताहर): अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा परिसरातील शिळफाटा येथून जवळपास 5 लाख 89 रुपयांचा अंमली पदार्थ, रोखरक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
          अमिन जाल मोहम्मद खान व बदरली इर्शाद अहमद शेख यांच्याकडे मेथाक्युलॉन हा अंमली पदार्थ त्यांच्याकडे असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा यांना मिळताच वपोनि बी.एस. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय शिंगे, पोलिस हवालदार रमेश उटगीकर आदींच्या पथकाने रूबी मार्केट गेटजवळ गुरूदत्त देव मंदिरासमोर छापा टाकून सदर मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या या दोघा इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडूनजवळपास 5 लाख 89 रुपयांचा अंमली पदार्थ, रोखरक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.