चाकूचा धाक दाखवून टेंपो चालकाला पावणे सहा लाखांना लुटले.

चाकूचा धाक दाखवून टेंपो चालकाला पावणे सहा लाखांना लुटले
पनवेल दि.08 (संजय कदम): चाकूचा धाक दाखवून एका टेंपो चालकाला पावणे सहा लाखांना लुटल्याची घटना पनवेल जवळील कर्नाळा घाटाच्या उतारावर घडली आहे.
जैसराज यादव (वय-24) हा त्याच्या ताब्यातील टेंपो घेऊन कामोठे ते माणगाव असा प्रवास करीत असताना कर्नाळा घाटाच्या उतारावर पळस्पे-पेण मार्गावर त्याच्या टेंपोमागून येणाऱ्या दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांच्या इसमांनी टेंपोला अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या टेंपो केबिनमध्ये ड्रायव्हर सीट खाली ठेवलेली 5 लाख 75 हजारांची रोखरक्कम, मोबाईल व टेंपोची चावी असा एकूण 5, 76, 600 रुपयांचा माल जबरीने चोरून ते पळून गेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *