14 वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेट निवड.

14 वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेट निवड

पनवेल : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे 14 वर्षाखालील मुलांची लेदर बॉल क्रिकेट निवड चाचणी 10 व 11 डिसेंबर 2021 रोजी, उरण येथील उरण क्रिकेट अँड स्पोर्टस असोसिएशन यांच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणीला चारशे मुलांचा सहभाग लाभला होता. या दोन दिवसीय निवड चाचणीतून एकूण 90 मुलांची पुढल्या फेरीकरीता निवड करण्यात आली व त्यांच्या मध्ये प्रत्येकी 15 जणांचे सहा संघ तयार करून सहा निवड चाचणी सामने खेळवण्यात आले. त्यातून अंतिम निवड चाचणी करिता 48 मुलांची निवड करण्यात आली. त्यांचे प्रत्येकी बारा जणांचे चार संघ तयार करण्यात आले व त्यांचे दोन निवड चाचणी सामने एम सी सी एच सोसायटी मैदान, पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. त्यामधून अंतिम 25 जणांची निवड करण्यात आली व त्यातील पहील्या 1 ते 14 जणांची टीम रायगड म्हणून निवड करण्यात आली. उर्वरित 15 ते 20 स्टँड बाय व 21 ते 25 राखीव खेळाडु असतील.
जाॅन्टी गलबले सर, सुमित झुंझारराव सर,विनेश ठाकूर, अजित म्हात्रे ह्यांनी सिलेक्टर व सुहास हिरवे सरांनी कोऑर्डीनेटर म्हणुन काम पाहीले. टीम रायगड आता नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इन्व्हीटेशन लीग टूर्नामेंट 21-22 मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज झाली आहे. आपण सी गटात असून यातील इतर संघ हिंगोली नाशिक व औरंगाबाद आहेत. आपला पहिला सामना सोमवार दिनांक 07 आणि 08/02/2022 रोजी हिंगोली विरुद्ध आहे. त्यानंतरचा सामना नाशिक विरुद्ध 10/11-02-2022 रोजी आहे व गटातील शेवटचा सामना औरंगाबाद विरुद्ध 13/14-02-2022रोजी आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सभासदांकडून आपल्या संघाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

विवेक बहुतुले सरचिटणीस रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन रायगड

Leave a Reply

Your email address will not be published.