अल्पवयिन मुलीला पळवून नेणाऱ्यास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात.

अल्पवयिन मुलीला पळवून नेणाऱ्यास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल, दि.6 (वार्ताहर)- पनवेल जवळील करंजाडे येथे राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयिन मुलीस फुस लावून तिच्या कुटूंबियांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचे अमिष दाखवून पळवून नेणाऱ्या इसमास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.

   करंजाडे येथे राहणारी 17 वर्ष 6 महिन्यांच्या मुलीला कुर्ला रेल्वे स्थानक येथे बोलावून त्यांनंतर तिला सूरत, अहमदाबाद व नंतर उत्तरप्रदेश येथील अखंडनगर, जि.- सुलतानपूर या गावी आरोपी विकास मिश्रा हा घेऊन गेला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल गिरी, पोना रविंद्र पारधी व महिला पोलिस शिपाई सुनिता गोलावर आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याचा माग काढून त्याच्या मूळ गावी अखंडनगर येथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले व त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सदर अल्पवयिन मुलीलासुद्धा ताब्यात घेऊन सुखरूप पनवेल शहर पोलिस ठाण्यात आणले आहे. त्यानंतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून सदर मुलीस तिच्या कुटूंबियांच्या ताब्यात देणार आहे.

     फोटोः पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलेली अल्पवयिन मुलगी

Leave a Reply

Your email address will not be published.