श्रीगणेश जन्मोत्सव दिघाटीत साजरा.
श्रीगणेश जन्मोत्सव दिघाटीत साजरा
पनवेल तालुक्यातील दिघाटी येथील श्रीगणेश मंदिरात मंगळवारी (4 जानेवारी) 2022 माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. नवतरुण गणेश मित्र मंडळातर्फे दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त दिघाटी येथील मंदिरात विविध धर्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदाही तीन दिवस काकडा, हरिपाठ, कीर्तन, अभिषेक आदी झाले. शुक्रवार सकाळी 9.30 वा. साईचे माजी सरपंच अण्णाशेठ पाटील, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, रमेश बाळाराम पाटील (वेश्वी), यांच्या हस्ते अभिषेक, सिकंदर म्हात्रे यांच्या हस्ते कलशपूजन, हसुराम लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. सकाळी 10.30 ह.भ.प ह.भ.प एकनाथ महाराज (कंठवली) यांचे श्रीगणेश जन्माचे कीर्तन झाले. या वेळी माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, बळीराम ठाकूर, कैलास पाटील, पुंडलिक पाटील, अर्जुन पाटील, अशोक पाटील, रामभाऊ पाटील, संदीप पाटील, गजानन पाटील, सिकंदर म्हात्रे, रवींद्र पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. सायंकाळी बापूजी देव प्रासादिक भजन मंडळाचा हरिपाठ झाला. रात्री श्री गणेश प्रासादिक नवतरुण मंडळाचे भजन झाले व 10 वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.