पनवेल महानगरपालिका प्रभाग क १० कळंबोली गाव या ठिकाणी कर्मचारी वाढवण्याची नगरसेवक रविंद्र भगत यांची मागणी.

पनवेल महानगरपालिका प्रभाग क १० कळंबोली गाव या ठिकाणी कर्मचारी वाढवण्याची नगरसेवक रविंद्र भगत यांची मागणी
पनवेल दि.04 (संजय कदम): पनवेल महानगरपालिका प्रभाग क १० कळंबोली गाव या ठिकाणी कर्मचारी वाढवण्याची मागणी नगरसेवक रविंद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेचे आय़ुक्त गणेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नगरसेवक रविंद्र भगत यांनी म्हटले आहे की, कळंबोली ग्रामपंचायत अस्तित्वात असताना कळंबोली गावामध्ये ४७ कामगार कार्यरत होते, त्या कर्मचा-याच्या माध्यमातून गटारे सफाई , डेनेज लाईन सफाई , रस्ते सफाई , औषध व धुर फवारणी व इतर अन्य कामाकरीता कर्मचारी काम करत होते , परंतु आजघडीला कळंबोली गावामध्ये ६ ते ७ कर्मचारी काम करत आहेत . त्यामुळे गावातील डनेज लाईन , गटरे , व रस्ते सफाई करण्यासाठी खुप अडचण निर्माण होत आहे . गेल्या ४ वर्षात सातत्याने अतंर्गत डिनेज लाईन व गटारे सफाई करण्यासाठी सांगत असताना सफाई कर्मचारी कमी असल्याकारणामुळे सफाई होवू शकली नाही . तरी प्रभाग क 10 कळंबोली गावात ४० कर्मचारी यांची भर्ती करण्यात यावी, कळंबोली गावातील काही ठिकाणी कचरा कुंडी ( डस्बिन ) उपलब्ध करुन देण्यात यावे, कळंबोली गावात दोन टाईम सकाळी व संध्याकाळी कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी व्यवस्था करण्यात यावी, कळंबोली गावात महादेव परशे घरा समोरील कचरा डंपिंग करत असलेले ठिकाण अतितात्काळ बंद करण्यात यावा, कळंबोली गावातील अदिवासी बांधव व इतर नागरीकांना नोकर भरती मध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे. वरिल विषयानुसार अतितात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटोः नगरसेवक रविंद्र भगत

Leave a Reply

Your email address will not be published.