अविश्रांत पाठपुराव्याला यश.

अविश्रांत पाठपुराव्याला यश..
शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका डॉ. सौ.सुरेखा विलास मोहोकर यांच्या अविश्रांत पाठपुराव्याला यश आले असून प्र. क्र.१८मधील वाल्मिकी नगर येथील सर्व गल्ली काँक्रिट करण्याचे काम सुरू झाले आहे.वाल्मिकी नगर हे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आहे परंतु चालण्याकरिता व्यवस्थित रस्तेदेखील नसणे,पाऊस पडल्यावर घरात पाणी साचणे अशा अनेक तक्रारी नगरसेविका डॉ.सुरेखा महोकर यांच्याकडे वारंवार येत होत्या.नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हे आपले आद्य कर्तव्य जाणून नगरसेविका डॉ. मोहोकर यांनी प्रशासनाकडे अविश्रांत पाठपुरावा करून वाल्मिकी नगर येथील गल्ली काँक्रीटीकरण करण्याचे काम मार्गी लावून घेतले.या कामाचे उद्घाटन नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर ,झिंझोटकर माऊली व लता म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.सर्व रहिवासी नागरिकांनी डॉ. मोहोकर यांचे आभार मानून आपापले गल्लीतील इतर सोयीसुविधा विषयीच्या सूचना केल्या व समाधान व्यक्त केले.नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर यांनी मा.आयुक्त गणेश देशमुख साहेब व सर्व अभियंत्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.