बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय मुलाला पनवेल तालुका पोलिसांनी काढले शोधून..

बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय मुलाला पनवेल तालुका पोलिसांनी काढले शोधून
पनवेल, दि.3 (संजय कदम)- बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय मुलाला पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊन अखेरीस शोधून काढल्याने त्याच्या कुटूंबियांचा जीव भांड्यात पडला.
तालुक्यातील टेमघर येथे राहणारा यज्ञेश कैलास आव्हाड (वय-13) हा सोसायटीत खेळत असताना त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवल्याची तक्रार त्याच्या आजीने पनवेल तालुका पोलिस ठाण्यात केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक नितीन पगार, सहा. पोलिस निरीक्षक अविनाश पाळदे, सहा. पोलिस चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल भोये, पोलिस नाईक मोकल, पोलिस शिपाई खताळ, महिला पोलिस नाईक लाड आदींच्या पथकाने ठिकठिकणी शोध घेऊन अखेरीस त्याला डोंबिवली येथून ताब्यात घेतले आहे व त्याच्या कुटूंबियांकडे त्याला सुपूर्त करण्यात आले आहे.
फोटोः पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने शोध घेतलेला 13 वर्षीय मुलगा

Leave a Reply

Your email address will not be published.