शिवसेना पक्षात INCOMING सुरुच..

आज दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननिय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री सन्माननिय आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली व शहर प्रमुख पनवेल प्रवीण जाधव यांच्या प्रयत्नाने टपालनाका पनवेल येथील श्री. शैलेश जगनाडे यांच्यासह नितिन कसाबे, विजय शिंदे व किरण गायकवाड यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, शहर प्रमुख खांदाकॉलनी सदानंद शिर्के, शहर प्रमुख कामोठे राकेश गोवारी, विभाग प्रमुख उत्तम मोर्बेकर, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपविधान अधिकारी सन्नी टेमघरे, शाखा प्रमुख अभिजीत साखरे, प्रसाद सोनवणे, यतीन मानकामे आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.