बेकायदेशीर बाईक रेपिडो व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा रिक्षा चालक कठोर भूमिका घेतील.

बेकायदेशीर बाईक रेपिडो व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा रिक्षा चालक कठोर भूमिका घेतील
पनवेल /रायगड
सध्या सर्रास नवी मुंबई मुंबई विभागामध्ये बेकायदेशीर बाईक राईडर ऑनलाईन बुकिंग करून व्यवसाय करत आहेत, तरी अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या वर प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करावी अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे, अनेक बाईक रेपिडो पकडून त्यांना रिक्षा चालकांनी नवीन पनवेल कळबोली नवीन मुंबई येथे समज देण्यात आली.सध्या खुले परमिट केल्यामुळे रिक्षाची संख्या वाढलेली आहे त्यामुळे रिक्षा व्यवसाय कमी झाला असून, गेली दोन वर्ष कोरोना मुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला आहे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. रिक्षा व्यवसाय करून कसेबसे रिक्षाचालक आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहे. त्यात आता बेकायदेशीर बाईक रायडर व्यवसाय करताना दिसत आहे. यांना कुठलाही कायदेशीर परवाना नाही तरीसुद्धा हा व्यवसाय सर्रासपणे सुरू असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन कारवाई करत नसल्याने रिक्षा चालकांमध्ये संताप दिसून येत आहे लवकरात लवकर अशा बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई न केल्यास रिक्षाचालक कठोर भूमिका घेतील असे मत रिक्षा चालक यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.