करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागनिहाय सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांची मुख्यमंत्र्यांना लेखी विनंती

अलिबाग, जि.रायगड, दि.11 (जिमाका)- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना राबवित आहे. मुंबई तसेच आसपासच्या परिसरात करोनाबाधित रुग्ण संख्या आटोक्यात राहावी व त्यासंबधी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई महानगरात सचिव/प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची झोननिहाय नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील पनवेल,उरण,खारघर, कामोठे, कळंबोली या मुंबई नजिकच्या उपनगरातही मुंबई महानगराप्रमाणेच विभागनिहाय सचिव/प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी, जेणेकरुन स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक सक्षमपणे राबविता येईल, यासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *