मालमत्ता धारकांसाठी ऑनलाईन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळणारस्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी.

मालमत्ता धारकांसाठी ऑनलाईन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळणार
स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी

पनवेल,दि.2 : पनवेल महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांसाठी ऑनलाईन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळण्याच्या विषयास स्थायी समितीच्या बैठकित मंजूरी देण्यात आली. महानगरपालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन सभा आज(2 फेब्रुवारी) मुख्यालयातील आयुक्त दालनासमोरील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.
यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक निलेश बावीस्कर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. गोसावी ,सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, , मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे तसेच सचिव तिलकराज खापर्डे उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये नवीन पाईप लाईन टाकणे, पाईप लाईन बदलणे व इतर कामे करणे, पनवेल शहरातील खाडीचे बाजुने आर.सी.सी. रिटेनिंग वॉल बांधकाम करणेकामी वाढीव खर्चास मान्यता मिळणे या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली. सरस्वती विद्यामंदीर धोकादायक इमारत तोडणे व त्यामधील वापरण्या योग्य साहित्य साहित्य घेऊन जाणे व भुखंड समतळ करणे व त्या बदल्यात महानगरपालिकेस देकार देण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
कोव्हिड-19 साथरोगाच्या अनुषंगे राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता बाह्य स्त्रोतांकडून (कोव्हिड कामकाजासाठी) कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे , कळंबोली येथील 72 खाटांच्या कोविड समर्पित केंद्र येथे “कोव्हिड-19” साठी अत्यावश्यक वेळी आवश्यक असणाऱ्या औषधी / औषधी साहित्य खरेदीस मंजूरी, तसेच इमुनायझेषण सिरीन्ज खरेदी करणे, आरटीपीसीआर लॅब उभारणे करिता यंत्रसामुग्री उपकरणे खरेदी करणे या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.

   पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची बाह्य यंत्रणेव्दारे सशुल्क कचरा उचलून विल्हेवाट लावणे तसेच 2021-24 करिता सार्वजनिक शौचालय, मुताऱ्या, स्वच्छतागृहांची अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन यांत्रिक पद्धतीने निर्जंतुकीकरण व दुर्गंधीनाशक रसायनांची दैनंदिन फवारणी करुन प्रति दिन 02 वेळा साफसफाई करण्याचे विषय स्थायी समितीने स्थगित ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published.