पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात निर्बंध शिथिलतेच्या सूचना जाहिर.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात निर्बंध शिथिलतेच्या सूचना जाहिर
पनवेल,दि.3 : महाराष्ट्र शासनाने 31 जानेवारी 2022 रोजी शिथिलतेचे आदेश जाहीर केले आहेत. राज्य शासनाने आस्थापनाच्या वेळा या स्थानिक प्राधिकरणाने ठरवण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पनेवल महानगरपालिका आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी महापालिका कार्य क्षेत्रातील आस्थापनांच्या वेळा जाहीर केल्या आहेत.
नाट्यगृहे रेस्टॉरंट्स, थिएटर, नाट्यगृह या आस्थापनांच्या वेळ तसेच भजन आणि इतर सर्व स्थानिक, सांस्कृतिक तसेच करमणुकीच्या कार्यक्रमांच्या वेळ सकाळी 6.00 ते त्री 12.00 अशी निश्चित करण्यात आली आहेत.
सकाळी 6.00 ते रात्री 10.00 या वेळेत इतर आस्थापना (अत्यावश्यक सेवा वगळून) तसेच समुद्रकिनारे, उद्याने, खुली राहतील. सदर ठिकाणी कोव्हिड अनुरूप वर्तनाचे नागरीकांकडून पालन केले जाईल या बाबतची दक्षता संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी घेण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबधितांवर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच, भारतीय दंड संहिता, यामधील कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल असे आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी आदेशित केले आहे. याशिवायचे शिथिलतेचे सर्व नियम हे राज्य शासनाच्या नियमांप्रमाणेच महापालिका क्षेत्रात लागू होतील.