कळंबोलीतील विशाखा अरुण कुरूपने पटकाविला मिस इंडिया 2021 चा फेस ऑफ दि इयर पुरस्कार..

कळंबोलीतील विशाखा अरुण कुरूपने पटकाविला मिस इंडिया 2021 चा फेस ऑफ दि इयर पुरस्कार
पनवेल, दि.3 (संजय कदम)- कळंबोली येथे राहणाऱ्या विशाखा अरुण कुरूप हिने जयपूर येथे आय़ोजित स्पर्धेत मिस इंडिया 2021 चा फेस ऑफ दि इयर हा पुरस्कार पटकावल्याने कळंबोलीचे नाव देशभरात पोहोचले आहे.
जयपूर येथे फॉरेव्हर स्टार इंडिया एवॉर्ड्सच्या माध्यमातून हॉटेल मेरिएटमध्ये नॅशनल लेव्हलवर चार दिवसीय मेगा ब्युटी आणि एवॉर्ड या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातून विशाखा अरुण कुरूप हिने फॉरेव्हर मिस इंडिया 2021 स्टेट कॅटेगरीमध्ये फेस ऑफ दि इयर हा पुरस्कार पटकावला आहे. या चार दिवसांमध्ये फॉरेव्हर मिस व मिसेस इंडिया याचा ग्रॅंड फिनाले फॉरेव्हर फॅशन विक व एवार्डचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातून नामांकित अशा 150 पेक्षा जास्त फॅशन डिजायनर्सने आपल्या वेगवेगळ्या क्रिएटीव्ह व युनिक कलेक्शनचे सादरीकरण केले. त्यामुळे या शो ला चारचांद लागले होते. या शोमध्ये मिस व मिसेस इंडिया यांच्यासह पूर्ण देशातील प्रत्येक शहर व राज्यातील विजयी स्पर्धकसुद्धा सहभागी झाले होते. अंतिम दिवशी 70 पेक्षा जास्त कॅटेगरीजमध्ये रिअल सुपरहिरोज व रिअल सुपरवुमन हे एवॉर्डसुद्धा देण्यात आले.
फोटोः फेस ऑफ दि इयर बनलेली विशाखा अरुण कुरूप

Leave a Reply

Your email address will not be published.