जिल्हाप्रमुख शिरीष घरत, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी दिला शिवसेना हिसका.

सुधारित बातमी…….

भातिजाने केल्या पनवेलमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हडप

जिल्हाप्रमुख शिरीष घरत, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी दिला शिवसेना हिसका

फडणवीस सरकारच्या काळातील जमीन घोटाळे येताहेत समोर

घोट गावातील शेतकऱ्यांचा भातिजा बिल्डरला विरोध

पोलिसांचे झुकते माप बिल्डरच्या दिशेने असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक

गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांची घेतली ग्रामस्थांनी भेट

भूमी अभिलेख कार्यालयात सर्व्हेला स्थगिती देण्यासाठी उप अधीक्षकांना दिले पत्र

पनवेल : राज भंडारी

तालुक्यातील घोट गावातील शेतकऱ्यांच्या गेल्या ७० वर्षांपासून कसल्या जाणाऱ्या जमिनी भाजपच्या तथाकथित बांधकाम व्यावसायिकाने तत्कालीन भाजपच्या फडणवीस सरकारच्या माध्यमातून हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी याठिकाणी भतिजाने हडप केलेल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भू संपादन विभागाचे अधिकारी पोलिस फौजफाट्यासह हजर झाले, मात्र यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा कडाडून विरोध केला. यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा हिसका दाखवून दिला.

मौजे घोट येथील जमीन सर्व्हे नंबर ३३/०, ६१/०, ६२/० मधील जमिनी ह्या देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने भतिजा बांधकाम व्यावसायिकाने सन २०१७ साली बेकायदेशीररीत्या आपल्या ताब्यात करून घेतल्या. अशाच पद्धतीने या बांधकाम व्यावसायिकाने खारघर आणि रोहींजण येथील जमिनी हडप केल्या असून येथे स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपचे असल्यामुळे आपले कोणी वाकडे करणार नाही, या बालबुद्धीने देवेंद्र फडणवीस आणि मनीष भतिजा यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू ठेवला. मात्र राज्यात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तत्कालीन भाजप सरकारच्या काळातील पनवेल परिसरातील जमीन घोटाळे हे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली बाहेर काढण्यात येत आहेत. येथील काही महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून भतिजाने जमिनींवर कब्जा मिळविण्यास सुरुवात केली. मात्र महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना याबाबत कोणत्याही कल्पना न देता ही प्रकरणे सुरू राहिली. ज्यावेळी येथील ग्रामस्थांनी शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या निदर्शनात ही बाब आणल्यानंतर त्यांनी पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांच्याकडे शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी सोपविली. यावेळी इतर चौकशी केल्यानंतर या फडणवीस आणि भतिजा यांनी भागिदारीमध्ये पनवेलमधील अनेक जागा हडप केल्याचे समोर आले आहे. भतिजाने तसेच अन्य जागा ह्या तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सह्याने हडप केलेल्या भाजपच्या तथाकथित व्यावसायिकांना धडा शिकवून तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत आणि पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल यांनी बोलताना सांगितले.

गेल्या ७० वर्षांपासून येथील शेतकरी या जमिनी कसत असून येथील शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेवून भाजपचे नेते लूट माजवत आहेत. ही बाब येथील स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती असूनदेखील त्यांनी हस्तक्षेप न केल्यामुळे आता पनवेल तालुक्यातील ग्रामस्थ प्रशांत ठाकूर यांना मतदान करून चूक केली असल्याचा पश्चाताप व्यक्त करीत आहेत. याबाबत येथील स्थानिक नागरिक यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेवून त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक विजय भालेराव यांना सर्व्हेला स्थगित करण्याबाबत भेट देवून पत्रव्यवहार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, घोटमधील माजी सरपंच सुनील पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित राहिले.

जमीन हडप करणाऱ्या भातिजा आणि फडणवीस यांच्या जामीन मोजणी सर्व्हेला विरोध करण्यासाठी एकवटलेल्या ग्रामस्थांमध्ये माजी सरपंच सुनील पाटील, दिलीप पाटील, कुलदीप पाटील, महेश पाटील, प्रदीप दारावकर, गणेश पाटील, राजेश पाटील, रघुनाथ पाटील, दत्तात्रेय पाटील, भरत दा, दिपेश डेली फिना, बाळाराम जाधव, हरीचांद्र जाधव, सागर जाधव, पियूश जाधव, निखिल भोईर, सौ.रुपाली पाटील, आत्माराम पाटील, पांडुरंग पाटील, सौ.भारती पाटील, सौ.सुप्रिया पाटील, हिराबाई पाटील, ताराबाई दारावकर, श्री रमेश चांगो पाटील, सौ यशोदा पाटील, निलेश पाटील, रामकृष्ण पाटील, किरण पाटील, सौ. बारकुबाई पाटील, अनंता पाटील, हरिदास पाटील मा.सरपंच, नामदेव पाटील, निलेश पाटील, हौसाबई गोंधळी, राहुल गोंधळी, सौ सुकन्या, निवृत्ती पाटील, गिरीश पाटील, कृष्णा पाटील, नितेश पाटील, तसेच संदीप दारावकर, हनुमान दारावकर, बाळकृष्ण दारावकर आदी उपस्थित होते.

कोट
राज्यात महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी भाजपचे भ्रष्ट सरकार कार्यरत होते. राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनीष भातिजा या व्यावसायिकाने राज्यातील अनेक भूखंड फसवणूक करून लाटले आहेत. नवी मुंबई जवळील रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या जागेला येणाऱ्या काळात वाढता भाव लक्षात घेवून शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार केला आहे. पनवेल तालुक्यातील अती मोक्याचे असे ३ मोठे भूखंड येथील स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संगनमताने हडप केले आहेत, मात्र कितीही राजकीय डावपेच खेळून चुकीच्या मार्गाने शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा केलेला प्रयत्न शिवसेना कदापी सहन करणार नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर राहील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल.

  • शिरीष घरत, शिवसेना जिल्हाप्रमुख, रायगड

कोट
गेली ६० ते ७० वर्षे आम्ही वडिलोपार्जित या जमिनी कसत आलो आहोत. येथील जुन्या आमच्या पूर्वजांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा तत्कालीन सरकारने घेवून शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. याबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढत असलो तरीही आम्ही शेतकऱ्यांनी ज्या लोकप्रतिनिधीला आमचा नेता म्हणून निवडला त्यानेच आमचा घात केला आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने या जमिनी भतिजा व्यावसायिकाच्या घशात घातल्या आहेत तशा तालुक्यातील अनेक जमिनी अदानी, अंबानी आणि वाधवा सारख्या व्यावसायिकांच्या घशात घातल्या आहेत. मात्र आमच्या जमिनी आम्हाला न मिळाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने उभे असल्याची प्रचिती या प्रकारावरून आम्ही जाणली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल हीच आशा आहे.

  • सुनील पाटील, शेतकरी, माजी सरपंच, घोट

Leave a Reply

Your email address will not be published.