युवासेनेच्या मागणीला यश ; पनवेल महानगरपालिकेने काढले मराठी पाट्या लावण्याचे अध्यादेश

युवासेनेच्या मागणीला यश ; पनवेल महानगरपालिकेने काढले मराठी पाट्या लावण्याचे अध्यादेश
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः महाराष्ट्र शासनाने (ठाकरे सरकार) राज्यभरातील दुकानावरील पाट्या मोठ्या अक्षरात मराठीत तसेच सोबत आपल्या आवडीनुसार तर कोणत्याही भाषेत लहान अक्षरात लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता त्यानुसार युवासेना – शिवसेनेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन विनंती केली होती की, पालिकेच्या माध्यमातून अधिकृत परिपत्रक काढून दुकान मालकांना मराठीत पाट्या लावण्याचे आदेश करावेत. अशी मागणी केली होती. त्यानुसार आज महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून आदेश दिल्याबद्दल पनवेल महानगरपालिका व आयुक्तांचे शिवसेना – युवासेनेच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
काही दिवसापूर्वी युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेवून अशा प्रकारे मराठी पाट्या लावण्याचे आदेश काढावेत अशी मागणी केली होती. यावेळी विधानसभा अधिकारी पराग मोहीते, पनवेल शहर उपविधानसभा अधिकारी सनी टेमघेरे, खारघर शिवसेना विभागसंघटक रामचंद्र देवरे, पनवेल शहर संघटक प्रवीण जाधव, नवीन पनवेल उपविधानसभा अधिकारी, निखील दिघे, युवा सेना अधिकारी संकेत पाटील, सुधीर शिंदे आदी उपस्थित होते. या मागणीला यश येवून आज महानगरपालिकेने प्रत्यक्ष अध्यादेश काढले असल्याची माहिती अवचित राऊत यांनी दिली.
फोटो ः आयुक्त गणेश देशमुख यांना मराठी पाट्या लावण्या संदर्भात निवेदन देताना अवचित राऊत यांच्यासह विधानसभा अधिकारी पराग मोहीते, पनवेल शहर उपविधानसभा अधिकारी सनी टेमघेरे, खारघर शिवसेना विभागसंघटक रामचंद्र देवरे, पनवेल शहर संघटक प्रवीण जाधव, नवीन पनवेल उपविधानसभा अधिकारी, निखील दिघे, युवा सेना अधिकारी संकेत पाटील, सुधीर शिंदे आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *