विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी घेतला कामाचा आढावा..

विभागप्रमुखांच्या बैठकित आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी घेतला कामाचा आढावा

पनवेल,दि.13 : तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, तळोजा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी, दफनभूमी अशी बांधकाम विभागातील विविध कामे, पाणीपुरवठा विभाग, वैद्यकिय आरोग्य विभाग, लेखा विभाग, प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध विभागातील विकास कामांचा आढावा आज(1 फेब्रुवारी) आयुक्तांनी विभागप्रमुखांच्या ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बैठकित घेतला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे तसेच सर्व विभागप्रमुख,खाते प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडकोकडील पाणी पुरवठ्याव्यतिरिक्त सर्व पायाभूत सुविधा पालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी संबधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी सुचना दिल्या. पाणीपुरवठा विभागातर्फे बांधण्यात येणाऱ्या 43 पाण्याच्या टाक्या, विहरींचा गाळ काढणे , ही कामे तातडीने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, अग्निशमन भवन, एसटीपी प्लॅन्ट येथे सोलार पॅनेल बसविण्यासाठी सविस्तर अंदाज पत्रक बनविण्याच्या कामाचा आढावा आयुक्तांनी घेतला.

महापालिका हद्दीतील लसीकरण वाढविणे, 15 -18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देण्याच्या सुचना आयुक्तांनी वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या.

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्र झोपडपट्टी मुक्त करण्याच्या उद्देशाने उर्वरित झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून लाभार्थी यादी निश्चित करणे व त्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या माध्यामातून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. दिव्यांग धोरण, फेरीवाला धोरण, रात्र निवारा तयार करणे ही कामे पुर्ण होण्याच्या दृष्टीने संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.