पाच वर्षापूर्वी बेपत्ता असलेल्या इसमाला खांदेश्वर पोलिसांनी आणले नाशिक वरून परत.
पाच वर्षापूर्वी बेपत्ता असलेल्या इसमाला खांदेश्वर पोलिसांनी आणले नाशिक वरून परत
पनवेल दि. ०१ (संजय कदम) : पाच वर्षांपूर्वी बेपत्ता म्हणून एका इसमाची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली होती. सदर इसमाचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन खांदेश्वर पोलीस ठाण्याचे व.पो.नि. कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे व त्यांच्या पथकांनी शोध घेऊन नाशिक येथून त्याला परत नवीन पनवेल येथे आणून त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते.
खांदेश्वर पो स्टे मनुष्य मिसिंग क्र 01/2016 प्रमाणे दि. 01.01.2016 रोजी दाखल होता. सदर मिसिंग मधील इसम नामे अमन महादेव जाधव, वय 39 वर्षे, रा.ठी. नवीन पनवेल हा कामानिमित्त बंगलोर येथे जातो सांगून पत्नी व दोन मुलांना सोडून निघून गेला होता. सदर व्यक्तीचा शोध पो.निरी. गुन्हे श्रीमती गलांडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार स.पो.निरी. पांडे व पो.हवा. सारंग, पो.हवा. कांबळे यांनी सदर इसमाचे पॅन कार्ड वरून व बँक अकाउंट वरून मोबाईल नंबर सिडीआरच्या तांत्रिक तपासद्वारे त्याचे कामाची व वास्तव्य ठिकाणची माहिती प्राप्त केली. दर इसम वारंवार फोन नंबर बदलत व बंद चालू करत असे तसेच रहाण्याचे ठिकाण बदलत असे. परंतु पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सुमारे 5 वर्षांनंतर सदर इसमास नाशिक शहर आडगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत हनुमान नगर येथून ताब्यात घेण्यात आले व खांदेश्वर पोलीस ठाण्यात आणून त्याला पत्नी व दोन मुलांकडे ताब्यात देण्यात आले. यावेळी सदर कुटुंबियांनि खांदेश्वर पोलिसांचे आभार मानले आहेत.