इस्त्राईलच्या राजदूतांनी घेतली आयुक्त गणेश देशमुख यांची भेट.

इस्त्राईलच्या राजदूतांनी घेतली आयुक्त गणेश देशमुख यांची भेट

पनवेल,दि.1 : पनवेल मधील इस्त्राइली दफनभूमीचा विकास करावा तसेच त्या अनुषंगाने असणाऱ्या विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज(1 फेब्रुवारी) इस्त्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी आणि इस्त्राईल वाणिज्यदूतातील विशेष प्रकल्प अधिकारी अनय जोगळेकर आज आयुक्त श्री. गणेश देशमुख यांची भेट घेतली.

पनवेलमध्ये अनेक वर्षापासून इस्त्रायली लोकांची वसाहत असून त्यांची दफनभूमी तसेच इतर धार्मिक स्थळे आहेत. त्यांचा विकास महापालिकेने करावा या हेतूने इस्त्रायलचे राजदूत कोबी शोशनी यांनी आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्याशी चर्चा केली. तसेच पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रस्तावित विविध उपक्रमांची माहिती यावेळी आयुक्तांनी शोशांनी यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.