वेश्या व्यवसाय करण्यासाठी परराज्यातून आणलेल्या सहा मुलींची केली सुटका..

वेश्या व्यवसाय करण्यासाठी परराज्यातून आणलेल्या सहा मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण शाखेने केली सुटका
पनवेल, दि.31 (संजय कदम) ः वेश्या व्यवसाय करण्यासाठी परराज्यातून आणलेल्या सहा मुलींची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाने नवीन पनवेल परिसरातून सुटका केली आहे.
नवीन पनवेल परिसरातील सेक्टर 7 या ठिकाणी साधारण दोन महिन्यापूर्वी रो-हाऊस भाड्याने घेवून दोन इसमांनी त्या ठिकाणी राजस्थान, उत्तरप्रदेश व दिल्ली या ठिकाणावरुन सहा मुली आणल्या होत्या. सदर मुलींना लेडीज बारमध्ये तसेच ज्या प्रमाणे गिर्‍हाईक असतील अशांकडे पाठविण्यात येत असे. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर रो-हाऊसवर छापा टाकून त्या ठिकाणावरुन सहा मुलींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन मुली अल्पवयीन असल्याचे समजते.
कोट
रो-हाऊसमधून सहा मुलींना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन मुली अल्पवयीन असल्याचे समजते. या संदर्भात वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच खरी माहिती समजेल. सदर मुली या परराज्यातील असून पकडण्यात आलेले आरोपी सुद्धा परराज्यातीलच आहेत.-वपोनि पराग सोनावणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *