खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपीस अटक.

वाशी रेल्वे पोलीस ठाणे

खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपीस CCTV फुटेज वरून ३ तासात व मुख्य आरोपीस (निष्पन्न विधिसंघर्ष बालक) यास ३६ तासात सातारा येथून पकडून गुन्हा उघडकीस आणलेबाबत.

दि.२९/०१/२०२२ रोजी दुपारी १.३० वा. प्रवासी नामे विष्णू राममिलन वर्मा वय-२२ वर्षे धंदा-फळविक्रेता रा-निर्मलधाम सोसायटी खोली न.G-1 गावदेवी मंदिर भाजी मार्केट ठाणे. हे तुर्भे ते ठाणे लोकलने फळे घेऊन लगेज डब्यामध्ये बसून प्रवास करत असताना तुर्भे ते कोपरखैरणे दरम्यान ताब्यातील बालक प्रथमेश रमेश चव्हाण वय-१७ वर्ष याने वरील प्रवासी यांच्या फळांच्या बॉक्स मधील किवी फळाची मागणी केली असता त्यावेळी फिर्यादी यांनी देण्यास नकार दिल्याने ताब्यातील बालक व त्याचे साथीदार १)शुभम शिवाजी अभंग वय-१९ वर्ष २)किशोर नारायण सोनवणे वय-२१ वर्ष या तिघांनी फिर्यादी यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ताब्यातील बालक याने त्याच्या कमरेत ठेवलेला चाकूने जख्मी याचे छातीवर मारून जख्मी करून कोपरखैरणे स्टेशन येथे उतरून पळून गेले होते..!!
सदर परिस्थितीचे गांभीर्य पाहून वपोनीच्या आदेशाने डी.बी.टीम घटनास्थळी पोहोचून सदर स्टेशनचे cctv फुटेज काढून खास बातमीदारा मार्फत आरोपी 1)शुभम शिवाजी अभंग वय-१९ 2)किशोर नारायण सोनवणे वय-२१ वर्ष यांना कोपरखैरणे नवी मुंबई येथून ताब्यात घेतले व ताब्यातील बालक हा त्याच्या मूळ गावी सातारा येथे पळून गेल्याने पोस्टेचे पो.शी.106/मेळावणे व पो.शि.081/शेजवळ यांना सातारा येथे रवाना करण्यात आले होते व तेथून ताब्यातील बालकास त्याच्या मूळ गावी जाऊन ताब्यात घेऊन पोस्टेला आणले व गु.र.नं.१८/२०२२ कलम ३०७,३२३,५०४,३४ भादवी या गुह्यत ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडी बाल सुधारगृह येथे करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा उघड़कीस आणला आहे..!!

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, लोहमार्ग,मुंबई यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार तसेच मा.पोलीस उपायुक्त,मध्य परिमंडळ यांचे मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वि. डी. केसरकर, पोलीस निरीक्षक पाडवी, उपनिरीक्षक भिंगारदिवे . पो.हा.३३८७ पाटील, पो.हवा. २५८ गायकवाड,पोना ८१९ इनामदार, पोना १०२४ सरगर, पोशी १३१५ दराडे, पोशी ९१४ मनवर ,पोशी १३४ हांडे, पोशी १०४१ फुंदे, पोशी -९७७ शिंदे, पोशी 1496 मैंदाड, पो.शी.०८० गोर्डे, पो.शी.१८६ गोसावी यांनी केलेली आहे.

(व्ही डी केसरकर)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
वाशी रेल्वे पोलीस ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published.