अज्ञात व्यक्तींकडून रात्री जाळला जातोय कचरा..

अज्ञात व्यक्तींकडून रात्री जाळला जातोय कचरा; कारवाईची मागणीपनवेल, दि.30 (संजय कदम)- नवीन पनवेल परिसरात साठलेला कचरा अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळेस जाळला जात असल्याने त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तरी अशा व्यक्तींविरूद्ध कारवाईची मागणी नवीन पनवेल मधील स्थानिक रहिवासी करीत आहेत.
          नवीन पनवेल येथील परिसरातील अनेक होर्डिंग पॉंड येथे फेरीवाले तसेच काही परिसरातील नागरिक रात्रीच्या वेळी कचरा टाकतात. सदर कचरा हा सिडको व महानगरपालिकेच्या माध्यमातून वेळोवेळी उचलला जातो व परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. मात्र काही जण हा जमलेला कचरा रात्रीच्या वेळी जाळत असल्याने हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व दुर्गंधी सुद्धा सुटते. कचरा जाळण्यास बंदी असतानाही हा प्रकार केला जातो. तरी अशा व्यक्तींविरूद्ध संबंधित विभागाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवासी करीत आहेत.       फोटोः साठलेला व जाळलेला कचरा

Leave a Reply

Your email address will not be published.