पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, एक जखमी..

पनवेल परिसरातील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, एक जखमी..
पनवेल, दि.30 (वार्ताहर)- पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, एक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पनवेल जवळील वडघर फाटा येथून एमपीएससी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. या घटनेतील मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा तसेच अज्ञात अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत सीबीडी येथून मोटारसायकलवरून मुंबई बाजूकडे जात असताना तेजस बर्गे व प्रदिप माने यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन झालेल्या अपघातात ते दोघे गंभीररित्या जखमी झाले. यात प्रदिप माने याचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. या अपघाताची नोंद सीबीडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.