स्वच्छ कामोठे – हरीत कामोठे..

स्वच्छ कामोठे – हरीत कामोठे…

आज कामोठे कॉलोनी फोरमतर्फे स्वच्छ कामोठे- हरीत कामोठे उपक्रमा अंतर्गत कामोठे हाय वे ब्रिज ते पोलीस स्टेशन चौक रस्त्यामधे असलेल्या दुभाजकावरील कचरा साफ करण्यात आला. यावेळी झाडे जगवण्यासाठी झाडांच्या आजुबाजुला असलेले गवत अणि कचरा साफ करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी नारळाच्या झावळ्या ह्या वायरला लटकलेल्या दिसल्या, ह्या झावळयांमुळे रस्त्याने जात असलेल्या दुचाकीस्वारास अडथळा निर्माण होऊन अपघात होण्यची दाट शक्यता आहे. अशा अनेक फांद्या अणि झावळ्या आज दुभाजकावरुन काढून टाकण्यात आल्या. अनेक ठिकाणी निर्माल्य दुभाजकावर फेकून दिल्याचे निर्दशनास आले. ह्यावेळी स्वच्छ कामोठे हरीत कामोठे चा संदेश देणारे फलक दाखविण्यात आले. तसेच शुभ शगून सोसयटी समोरील मोबाईल टॉवर उभारणीच्या कामामुळे तयार झालेले डेब्रिज दुभाजकांवरच टाकण्यात आलेले आहे. त्यामूळे तेथील झाडांचे नुकसान झाले असुन हिरवळ नष्ट झाली. कामोठे कॉलोनी फोरमच्या समन्वयकांनी शहर सुशोभिकरणाची मोहीम हाती घेतली असुन यामधे पालिका अणि सिडको प्रशासनाचे सहकार्य अपेक्षीत आहे. पुढील 7 दिवसांत कामोठे शहरातील दुभाजक जर स्वच्छ नाही करण्यात आले तर दुभाजकांवरील कचरा सिडको ऑफ़िस ला नेऊन टाकण्यात येईल असा इशारा कॉलोनी फोरमच्या वतीने देण्यात आला.
ह्या स्वच्छता मोहिमेमधे कामोठे कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, फोरमचे समन्वयक बापू साळुंखे , समाधान काशिद, डॉ. गारळे, राहुल आग्रे, महेंद्र जाधव, अरुण जाधव, रवी पाढी, हिरा भट, सागर अलदर , संभाजी पवार, अमित घुटूकडे, अरूणा सावंत, शुभांगी खरात, निवेदिता बारापात्रे, सुधा सिंग, मनिषा नीलकंठ सहभागी झाले होते.

For The people, By the people

लोकांनी, लोकांसाठी

Leave a Reply

Your email address will not be published.