रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे समाजसेवक ऍड.मनोहर सचदेव सन्मानित.

रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे समाजसेवक ऍड.मनोहर सचदेव सन्मानित. पनवेल / प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा रोटरी वोकेशनल एक्सेलेन्स अवॉर्ड 2021-22 ने गौरविण्यात आले. श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष समाजसेवक ऍड.मनोहर सचदेव यांना अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गेली पाच वर्षापासून झुलेलाल ट्रस्टतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात अनेक संघटनायांना सोबत घेऊन त्यांच्या संयुक्त विद्यमाने सचदेव हे विविध ठिकाणी अन्नदान, फूड किटचे वाटप , ब्लॅंकेट वाटप करित असतात. कोरोना काळामध्ये सचदेव यांनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाटप केले तसेच महाड पोलादपूर येथे पूरग्रस्तांना तात्काळ मदतीचा हात त्यांनी दिला या कार्याची दखल घेऊनच रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.