बकरी चोर शहर पोलिसांच्या ताब्यात..

बकरी चोर शहर पोलिसांच्या ताब्यात..
पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः पनवेल शहरातून बकरी चोरी करणार्‍या दोघांपैकी एकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हाजी रमजान सय्यद रा.विश्राळी नाका, पनवेल शहर या ठिकाणी यांच्या काही बकर्‍या परिसरात फिरत असताना सराईत बकरी चोर सलीम बाबु शेख (43) व त्याचा सहकारी या दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या चार चाकी गाडीमध्ये त्या बकर्‍यांपैकी तीन बकर्‍या गाडीत टाकून ते पसार झाले. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहा.पो.निरीक्षक दळवी, पो.उपनिरीक्षक शिंदे व त्यांचे पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराद्वारे सदर आरोपीचा माग काढून त्याला चेंबुर परिसरातून ताब्यात घेतले असून गुन्ह्यातील तीन बकर्‍या व गुन्ह्यात वापरलेली गाडी असा मिळून जवळपास लाखो रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी सुद्धा त्याने मुंबई परिसरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटना केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.