माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नवघर जिल्हा परिषद विभागातील महिला बचत गटांना विविध साहित्याचे वाटप.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नवघर जिल्हा परिषद विभागातील महिला बचत गटांना विविध साहित्याचे वाटप.

जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या प्रयत्नाने महिला व बाळ कल्याण विभागातून मंजुरी.

उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )
बुधवार दिनाकं 26 जानेवारी 2022 या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते नवघर जिल्हा परिषद विभागातील महिला बचत गटांना विविध साहित्याचे वाटप वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे महिला व बाल कल्याण विभागातून सदर मंजुरी मिळवली होती.यामध्ये श्री विठ्ठल- रखुमाई प्रसन्न महिला बचत गट भेंडखळ यांना भजन साहित्य, कुलस्वामिनी बचत गट पागोटे यांना पापड मशीन, द्रोणागिरी प्रकल्पग्रस्त बचत गट पागोटे यांना सतरंजी, माऊली महिला बचत गट भेडखळ यांना सतरंजी, अष्टविनायक स्वयं सहाय्यता महिला बचत गट पागोटे यांना दळण मशीन, श्रमिक महिला बचत गट भेंडखळ यांना पापड मशीन व क्रांती स्वयसाहयता महिला समूह फुंडे यांना सतरंजी यांचा समावेश होता. सदर साहित्य माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते प्राथमिक शाळा भेंडखळ, तालुका उरण येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आल्या.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, विजय-विकास सामाजिक संस्थेचे विकास भोईर, विधी सेलचे अध्यक्ष मछिंद्र घरत, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.