मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश-प्रभाग 18 मध्ये प्रथमच विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात.

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश-प्रभाग 18 मध्ये प्रथमच विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात.
प्रभाग क्र १८ मधील आशियाना सोसायटी ते विरुपाक्ष हॉल पर्यंत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे,या प्रभागाचे कार्यतत्पर नगरसेवक तथा पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर विक्रांत पाटील यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.
स्वा.वीर सावरकर चौक ते अमरधाम या रस्त्याच्या काँक्रिटकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे,परंतू विरुपाक्ष हॉल ते आशियाना सोसायटी पर्यंत तीन विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध आले होते.हे खांब धोकादायक ठरू लागले होते व त्यामुळें तिथे २-३ दुर्घटना झाल्या होत्या.
या विषयाचा सततचा पाठपुरावा आणि अधिकाऱ्यांच्या मागे लागल्याने नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अखेर यश आले आहे.आशियाना सोसायटी ते रिलायन्स फ्रेश पर्यंत चे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे कामही मंजूर करून घेण्यात आले आहे आणि लवकरच या कामालाही सुरुवात होणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.
या कामाची यशस्वी सुरुवात केल्याबद्दल नागरिकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.