पनवेल तालुक्यात शिवसेनेचा भाजप आणि शेकापला जोरदार धक्का..

पनवेल तालुक्यात शिवसेनेचा भाजप आणि शेकापला जोरदार धक्का

ग्रामपंचायत भिंगार -भेरले आदिवासी वाडीतील शेकडो ग्रामस्थ शिवसेनेत

पनवेल : राज भंडारी

भाजपा आणि शेकापचे वर्चस्व असलेल्या भिंगार – भेरले ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो नागरिकांनी नुकतेच आपल्या मनगटावर शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवसेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यावरण पर्यटन व राज्यशिष्टाचार मंत्री (महाराष्ट्र राज्य) आदित्य ठाकरे आणि उदयोग मंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या विषेश प्रयत्नाने या ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.

पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष आणि भाजप अशी लढत पाहायला मिळत आहे, मात्र नव्याने समीकरण बदलत चालली आहेत. तालुक्यातील या दोन्ही मातब्बर पक्षांच्या स्पर्धेत आता शिवसेना आणखी दोन पावले पुढे जात आहे. सर्वप्रथम ग्रामीण भागातील नागरिक हे मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत दाखल होत आहेत. यावेळी पनवेल तालुका संघटक भरत पाटील, तालुका समन्वयक प्रदीप ठाकूर, कळंबोली शहर समन्वयक गिरीश धुमाळ, शिवसेना उप शहर प्रमुख नारायण फडतरे, ज्ञानेश्वर भंडारी, शाखाप्रमुख संदिप घोगरे, शिवसैनिक रोशन कडव, अरूण पाटील, रविन्द्र भोपी आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *