महापालिकेला यशामध्ये नागरिकांचा मोठा वाटा..

महापालिकेला यशामध्ये नागरिकांचा मोठा वाटा : डॉ कविता किशोर चौतमोल
महापालिकेचा ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा

पनवेल,दि. २६ : पनवेल नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर पनवेल शहराबरोबरच महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासालाही गती मिळत असून पालिका क्षेत्राच्या सर्वांगिण विकासावर भर दिला जात आहे. असे प्रतिपादन महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल यांनी ध्वजारोहण प्रसंगी केले.

 पनवेल महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आज महापौर डॉ कविता किशोर चौतमोल, आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उप महापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सह सर्व नगरसेवक  उपस्थित होते.

 डाॅ. चौतमोल पुढे म्हणाल्या, कोरोना महामारीचे संकटावर आपण यशस्वीपणे मात करत आहोत. स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये आपल्याला मिळालेल्या यशामध्ये नागरिकांचा खूप मोठा वाटा आहे. याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले. आपण यावर्षी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून आजपासून आपण लोकशाही पंधरावडा साजरा करत आहोत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदार नोंदणी करणे व मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे.

यावेळी रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल,पालिकेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी संचलन केले तसेच ध्वजाला मानवंदना दिली. शिक्षण विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले.

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.