प्रजासत्ताक दीना निमित्त सुरक्षा रक्षकांना सर्वोत्कृष्ठ सुरक्षा रक्षक किताब प्रदान.
प्रजासत्ताक दीना निमित्त सुरक्षा रक्षकांना सर्वोत्कृष्ठ सुरक्षा रक्षक किताब प्रदान
उरण दि २६(विठ्ठल ममताबादे )
उरण सामाजिक संस्थेच्या भगीरथ प्रयत्नानंतर ०१ डिसेंबर २०२० रोजी GDL CFS मध्ये जॉईन झालेल्या रायगड सुरक्षा मंडळाच्या २६ सुरक्षा रक्षकांपैकी कु.नामदेव खाडे (मु.केगांव, ता – उरण ), प्रतिकेश पाटील ( मु.अलिबाग), कु सागर जाधव,( मु. कळंबुसरे,ता.उरण), भास्कर सुरडकर( उरण कोटनाका, ता.उरण) या ४ सुरक्षा रक्षकांना दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी GDL – CFS मध्ये पार पडलेल्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहनाच्या शानदार कार्यक्रमात GDL प्रशासनातर्फे सर्वोकृष्ट सुरक्षा रक्षक हा किताब देऊन गौरविण्यात आले. यामध्ये एक मेडल, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू यांचा समावेश आहे.उरण सामाजिक संस्थेच्या व रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्या वतीने चौघा सुरक्षा रक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून चंद्रकांत पाटील,विक्रांत दयाल,रियाज शेख,वैभव गावंड,अनिल पाटील,के.डी. भोईर ,GDL-CFS चे कर्मचारी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.