ट्रॅफिक पोलिसांना मास्क व सॅनिटायजरचे वाटप.

ट्रॅफिक पोलिसांना मास्क व सॅनिटायजरचे वाटप.

उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील करळ फाटा येथे वाहतूक शाखा कार्यालयातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थे तर्फे सामाजिक बांधिलकी जपत मास्क व सॅनिटाजरचे वाटप करण्यात आले.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार,खजिनदार -सुरज पवार, सचिव -प्रेम म्हात्रे, चेतन पाटील,गणेश म्हात्रे,समीर पाटील,नितेश पवार, सुविध म्हात्रे, शुभम ठाकूर, आकाश पवार, साहिल म्हात्रे, सादिक शेख आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, PSI – संजय पवार,ट्रॅफिक पोलीस कर्मचारी विशाल भिसे यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.