ग्रेसफुल हँड्स ट्रस्टचा स्थापना दिवस साजरा..

ग्रेसफुल हँड्स ट्रस्टचा स्थापना दिवस साजरा
पनवेल दि.25 (वार्ताहर): ग्रेसफुल हँड्स ट्रस्टने पहिला स्थापना दिवस आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष/सेटलर यांनी ट्रस्टचा उपक्रम ते संस्थेपर्यंतचा प्रवास सांगून केली. कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपल्यासह इतरांचेही जीवन उजळवणारे दीपप्रज्वलनाने करण्यात आली. अध्यक्षा पायल अनिश मधोक यांनी पनवेल शहर महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल यांचे स्वागत केले व उपमहापौर सीता ताई यांच्यासह त्यांचा सत्कार केला.
         कार्यक्रमाचे आयोजन मुख्य सदस्य पायल अनिश मधोक, नम्रता धनावडे, संध्या सिन्हा, बलविंदर कौर परमार, सपना मेहरोत्रा, मौसमी बाला, सुरेखा पंडित, लता पी. कुरियन यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल नम्रता ठक्कर, ज्योती अग्रवाल, डॉ. विनय शेलार, अलका कुमार, उषा देशपांडे, पास्टर रेजी थॉमस, विनायक पाटील ,मनोज कुमार, मुकेश मिश्रा, डॉ सरिता कालेल यांचाही सत्कार करण्यात आला. काही सदस्यांना ट्रस्टच्या प्रवासातील योगदान आणि प्रयत्नांसाठी पुरस्कारही देण्यात आला आणि नवीन सदस्यांची अधिकृतपणे टीममध्ये नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.