नवी मुंबई सहायक पोलीस उप निरीक्षक ,पांडूरंग पंढरीनाथ निघोट यांना राष्ट्रपती पदक जाहीर.

नवी मुंबई सहायक पोलीस उप निरीक्षक ,पांडूरंग पंढरीनाथ निघोट यांना राष्ट्रपती पदक जाहीर

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत
श्री. पांडुरंग पंढरीनाथ निघोट सहा. पोलीस उप निरीक्षक, पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई सन १९९२, १९९७, २०००, २००४, २००६ या कालावधीत नक्षल भागात गडचिरोली स्थानिक पोलीस व सी-६० पथक गडचिरोली यांचे सहकानि नक्षलग्रस्त भागात नक्षलकारवायांना आळा घालणेकरिता अत्यंत निर्मिडपणे व जोखमीचे कर्तव्य पार पाडल्याने तसेच सन १९९३ मधील मुंबई जातीय दंगलीच्या अनुषंगाने जेजे हॉस्पीटल पायधुनी पोलीस ठाणे, डोंगरी पोलीस ठाणे या अतिसंवेदनशील भागात जोखमेची कर्तव्य स्विकारुन कायदा व सुव्यवस्था, जातीय दंगल बंदोबस्त अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडल्याने त्यांना उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरविण्यात आलेले आहे. तसेच सन २००६ मधील भिवंडी शहरामध्ये निजामपुरा पोलीस ठाणे वर झालेल्या हल्ल्यांमध्ये व झालेल्या गोळीबारानंतर उसळलेल्या जातीय दंगलीत दोन पोलीस जवान मारले गेले. सदर दंगलीमध्ये दंगल काबूत आणणेकरीता कायदा व सुव्यवस्था उत्तम प्रकारे हाताळल्याने व संवेदनशील भागात चोख कर्तव्य बजावल्याने उत्तेजनार्थ बक्षिस देवुन गौरविण्यात आलेले आहे.
त्यांच्या एकुण ३२ वर्षे सेवा कालावधीत त्यांच्या अतिउत्कृष्ट दर्जाच्या कामगिरीमुळे एकुण २०० बक्षिस प्राप्त झालेली असुन ६ प्रशस्तीपत्रक देण्यात आलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्टभपती मार्फत गुणवत्तापुर्ण व अतिउत्कृष्ट दर्जाच्या कामगिरीमुळे त्यांना राष्टभपतीचे पोलीस पदक जाहिर झालेले आहे.त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री. पांडुरंग पंढरीनाथ निघोट सहा. पोलीस उप निरीक्षक यांनी सांगितले कि, मा.राष्टभपती महोदय यांनी मला गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदक प्रदान करून सन्मानित केलेले आहे. ३२ वर्षाच्या सेवेत माझे गुरू व आईवडिलांचे आशिर्वाद, मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी कर्तव्यात साथ देणारे सर्व सहकारी व प्रोत्साहित करणारे मित्र व आप्तेष्ठ, विश्वास व जिव्हाळा असलेले कुटंबीय, सर्व प्रसंगी सयंम बाळगुन वात्सवाचे भान करून देणारे माझी सौभाग्यवती या सर्वांचे आभार मानले.🙏🏾💐

Leave a Reply

Your email address will not be published.