कळंबोली रहिवासी परिसरातील पार्किंग समस्येबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक संपन्न..

कळंबोली रहिवासी परिसरातील पार्किंग समस्येबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक संपन्न
पनवेल, दि.22 (वार्ताहर)- कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीतील कळंबोलीतील रहिवासी तसेच रोडपाली गावातील रहिवासी विभागांमध्ये होत असलेल्या जड-अवजड व टॅंकर या वाहनांच्या पार्किंगच्या अनुषंगाने कळंबोली गुरुद्वारा येथे शिख समाज ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला कळंबोली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, कळंबोली वाहतूक विभाग पोलीस उपनिरीक्षक सुरेश थोरात, पोलीस उपनिरीक्षक मुळीक, पोलिस उपनिरीक्षक साळुंके यांच्यासह सिडकोचे उप अभियंता श्री.गाडे, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्यावतीने श्री.थोटे व शीख समाजाचे ट्रान्सपोर्टचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 
        यावेळी कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीतील रहिवासी विभागामध्ये होत असलेल्या पार्किंगचा अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी समजावून सांगितल्या व सदर ठिकाणी त्यांची जड-अवजड वाहने, टँकर इत्यादी वाहने पार्किंग न करता सुरक्षित ठिकाणी पार्क करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित शिख ट्रान्सपोर्टचे पदाधिकारी यांनी सदर बाब मान्य केली असून त्यांची वाहने काढून घेतली जाणार आहेत. सदरची वाहने शासकीय अथवा पे अँड पार्किंग मध्ये लावण्याचे ट्रान्सपोर्टच्या पदाधिकाऱ्यांनी कबूल केले आहे. परंतु सदर पार्किंग मध्ये त्यांना सवलत मिळावी अशी विनंती देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
         

Leave a Reply

Your email address will not be published.