अवैध शिपींग कंपन्यांवर कारवाई करण्याची आयुक्तांकडे मागणी

अवैध शिपींग कंपन्यांवर कारवाई करण्याची भाजपा कामगार आघाडीची पोलिस आयुक्तांकडे मागणी
पनवेल, दि.22 (संजय कदम)- मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध शिपींग कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपा कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी तसेच नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे चिटणीस व सहकार भारतीचे नवी मुंबई उपाध्यक्ष संजय पवार यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.         या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पनवेलसह नवी मुंबई परीसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध शिपींग कंपनीच्या बाबतीत अनेक गैरप्रकार उघडकीस येत आहेत. नवी मुंबई परीसर हा जागतिक दर्जाच्या शिपींग व्यवसायाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे व या व्यवसायाकरीता देशभरातून तरूण रोजगार मिळवण्यासाठी नवी मुंबई येत असतात. अशा गरजु तरुणांची अनेकदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुक होत असते . अशा अनेक तक्रारी आपल्याकडे आमच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत . पण अनेक वेळा अशा बोगस कंपनीचे मालक देखील खोटे असल्याने पोलीस प्रशासन देखील अशा प्रकरणामध्ये हतबल भासते . तरी केंद्रिय शिपिंग मंत्रालयाच्या नियमावली नुसार शिपींग क्षेत्रात काम करण्यासाठी अशा कंपनीला RPSL ( Recruitment & Placement Services Licence ) जरूरी असते पण अशा बोगस कंपनीकडे कोणत्याही प्रकारचे असे लायसन्स नसते तरी काही तरुण अशा कंपनीच्या प्रलोभनाला फसून आर्थिक फसवणुक करून घेतात. तरी अशा बोगस व लायसन्स नसलेलया शिपींग कपन्यांवर पोलिसांनी कठोर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, विशेष कार्यकारी अधिकारी तसेच नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे चिटणीस व सहकार भारतीचे नवी मुंबई उपाध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published.