हनुमान फुलोरे यांना पितृशोक
हनुमान फुलोरे यांना पितृशोक
पनवेल : तालुक्यातील भोकरपाडा (चिपळे) गावातील सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे हौसी नवयुवक हनुमान फुलोरे यांचे पिताश्री पदू भाडु फुलोरे यांचे वयाच्या ८३ व्या दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, नातु, सुना असा मोठा फुलोरे परिवार असून भोकरपाडा स्मशानभूमीत ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्यासह सर्व स्तरांतील मंडळींनी श्रध्दांजली अर्पण केली.