भारतीय मजदुर संघाची भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर देशभर निदर्शने

भारतीय मजदुर संघाची भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर देशभर निदर्शने

उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )
कंत्राटी कर्मचाऱ्यांना 1995 पासून भविष्य निर्वाह निधी योजना लागू आहे.या योजनेच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांना 1995 पासून भविष्य निर्वाह निधी पेन्शन योजनेच्या माध्यमातून पेन्शन मिळते आहे.सद्या ही पेन्शन 1000 एवढी तुटपुंजी आहे.वाढती महागाई बघता ती खूप अत्यल्प आहे.त्यात भरीव वाढ होण्याची आवश्यकता आहे.ही वाढ 5000 रू.करावी अशी मागणी भारतीय मजदुर संघाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे 19 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या प्रि बजेट मीटिंग मध्ये भारतीय मजदुर संघाने केली होती.
सदरची मागणी येत्या अर्थ संकल्पात मान्य करावी व या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक 20 जानेवारी 2021 रोजी सर्व रिजनल ऑफिसवर निदर्शने करण्याचे ठरल्यानुसार त्याचाच एक भाग म्हणून रायगड जिल्हा भारतीय मजदुर संघाने भविष्य निर्वाह निधी कार्यालय वाशी येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.वाशी कार्यालयाचे सिनियर कमिशनर चव्हाण,कमिशनर श्रीवास्तव यांच्या कडे निवेदन सुपूर्द केले. भारतीय मजदुर संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष अनिल दुमने, रायगड जिल्हा अधक्ष व पोर्ट महासंघाचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, जिल्हा सेक्रेटरी अशोक निकम,उपाध्यक्ष मधुकर पाटील, भारतीय मजदुर संघाचे नेते निरंजन कुमार,रवि जोशी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.